

कसबा सांगाव (जि. कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर झेडपी अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेला देण्याच्या जोरदार चर्चा सूर असताना कोल्हापूर झेडपी अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले. यामुळे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांच्या समर्थकांनी कसबा सांगाव येथे रास्तारोको आंदोलन केले.
अधिक वाचा :
अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डावल्याच्या भावनेतून कसबा सांगाव येथे निषेध करण्यात आला. घटनास्थळी कागल पोलिस तात्काळ दाखल झाले त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी कागल पोलिसांनी लाठीचार्ज केला.
गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि समिती सभापतीपदाचे राजीनामे देण्यात आले. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून युवराज पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांचे नाव मागे पडले.
अधिक वाचा :
याबाबतची माहिती कळताच सकाळी अकराच्या सुमारास कसबा सांगाव बाजारपेठेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अन्य पक्षाचे कार्यकर्ते एकत्र जमले. त्याने रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी सरपंच रणजित कांबळे, शेतकरी संघटनेचे नेते अविनाश मगदूम यांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. अजूनही युवराज पाटील यांना संधी द्यावी अशी मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
अधिक वाचा :
ग्रा. प सदस्य मेहताब मुल्ला दीपक हेगडे, संतोष माळी, अमर कांबळे , बाळासो लोखंडे, इनायत मुल्ला, मानसिंगराव जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
कोव्हिडच्या काळात कसबा सांगाव हॉटस्पॉट असताना जमाव जमवून सर्वसामान्यांना त्रास देणे कितपत योग्य आहे?. खोळंबलेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी बळाचा वापर करून सौम्य लाठीचार्ज केला. असे पोलिस निरिक्षक दत्तात्रय नाळे म्हणाले.
– दत्तात्रय नाळे, पोलीस निरिक्षक कागल
हे ही वाचा :
हे ही पाहा :