मुंबईत लेप्टोचा पहिला बळी! नायर हॉस्पिटलमधील १४ जून रोजी मृत पावलेल्या रुग्णाचा अहवाल | First Death of Lepto | पुढारी

मुंबईत लेप्टोचा पहिला बळी! नायर हॉस्पिटलमधील १४ जून रोजी मृत पावलेल्या रुग्णाचा अहवाल | First Death of Lepto

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत लेप्टोचा यावर्षीचा पहिला बळी गेला आहे. पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटलमध्ये 11 जूनला लेप्टोची लक्षणे असलेल्या एका रुग्णाला दाखल करण्यात आले होते. मात्र 14 जूनला त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू लेप्टोने झाल्याचे अखेर वैद्यकीय अहवाला स्पष्ट झाले आहे. (First Death of Lepto)

मुंबईत 1 जानेवारीपासून 30 जूनपर्यंत लेप्टोचे 432 रुग्ण सापडले होते. तर जून महिन्यात 97 रुग्णांची नोंद झाली. 2022 मध्ये लेप्टोने 5 जणांचा बळी गेला होता. तर 2019 मध्ये तब्बल 11 जण दगावले होते. यंदा लेप्टोचा पहिला बळी गेला आहे. नायर हॉस्पिटलमध्ये 14 जूनला मृत्यू झालेल्या रुग्णांचा वैद्यकीय अहवाल हॉस्पिटलला प्राप्त झाला असून यात लेफ्टोने मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी लेप्टोमुळे एका मृत्यूची नोंद झाली असल्याचे एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

Back to top button