चीन्यांना धडा शिकवण्यासाठी स्पेशल त्रिशूल लष्कराकडे येणार | पुढारी

चीन्यांना धडा शिकवण्यासाठी स्पेशल त्रिशूल लष्कराकडे येणार

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन

भारत आणि चीन या दोन देशातील सीमेवर गेल्‍या काही महिन्यांपासून तणावपूर्ण परिस्‍थिती आहे. चीनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर अचानक हल्‍ला चढवला होता. यावेळी चीनी सैनिकांनी अनुकुचिदार हत्‍यारे, काटेरी तार गुंडाळलेले लाकडी ओंढके यासारख्या शस्‍त्रांचा वापर करत भारतीय सैनिकांना जखमी केले होते.

चीनी सैनिकांनी पुन्हा अशी आगळीक केली, तर त्‍यांना जशाच तसे उत्‍तर देण्यासाठी भारतीय लष्कराने तयारी केली आहे. त्‍यासाठी भारतीय सैन्याला खास शस्‍त्रे देण्यात आली आहेत. लष्करासाठी विना-प्राणघातक शस्त्र ‘वज्र’ आणि ‘त्रिशूल’ बनवण्यात आले आहे. चीनी सैनिकांशी दोन हात करण्यासाठीच्या हत्‍यार बनवण्याचे काम नोएडा येथील एका फर्मला सोपवण्यात आले होते. या फर्मने सैन्यासाठी भगवान शंकराचे “त्रिशूल” सारख्या पारंपारिक भारतीय शस्‍त्राने प्रेरित विना-प्राणघातक (Non-Lethal Weapons) बनवली आहेत.

jammu and kashmir : १४ दिवसात दोन अधिकाऱ्यांसह ९ जवान शहीद, ९ नागरिकांची हत्या

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारतीय सैन्याचा निर्णय…

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारतीय सैन्याकडून नोएडा येथील एका स्‍टार्टअप फर्मला चीनी सैन्याशी लढण्यासाठी आवश्यक शस्‍त्र निर्मितीचे काम सोपवले होते.

या फर्मने शंकराच्या त्रिशुल सारख्या पारंपारिक भारतीय शस्‍त्रातून प्रेरणा घेवून त्रिशुलासारखे हत्‍यार बनवले आहे. यामध्ये घातक आणि विना प्राणघातक अशा शस्‍त्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

खास ‘त्रिशूल’ नावाचे शस्‍त्र बनवण्यात आले आहे.

शस्‍त्र निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या माहितीनुसार, ‘वज्र’ नावाच्या स्‍पाइक्‍स सोबत मेटल रोड टेसर विकसित केले आहे. या शस्‍त्राचा वापर शत्रू सैनिकांवर आक्रमक पध्दतीने हल्‍ला चढवता येतो. शिवाय शत्रुच्या बुलेट प्रूफ वाहनांना पंक्‍चर देखील करता येते.

या वज्र शस्‍त्रामधून इलेक्‍ट्रिक करंट देखील बाहेर पडतो. हे शत्रू सैन्याला समोरा-समोरच्या लढाईत पराभूत करू शकते. याशिवाय खास ‘त्रिशूल’ नावाचे शस्‍त्र बनवण्यात आले आहे. ज्‍या व्दारे शत्रूचे वाहन थांबवता येते.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर एकमेकांवर ६ वाहने आदळली; कारचा अक्षरश: बुक्का

‘सॅपर पंच’ नावाचे एक ट्रेसिंग उपकरण बनवण्यात आले आहे. जे हिवाळ्यातील कडक थंडीमध्ये हाताच्या पंजांना हॅडग्‍लोज प्रमाणे वापरता येते.

याच्या साह्याने हा हल्‍लेखोर शत्रू सैनिकाला एक किंवा दोन झटके देता येते. कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मते या हत्‍यारांनी कोणाचाही मृत्‍यू होणार नाही, मात्र ही शस्‍त्र शस्‍त्रू सैनिकांना अप्रभावी बनवू शकतात.

ओव्हरनाईट फंड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी लाभदायी पर्याय

गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीदरम्यान चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर टेसर आणि काटेरी क्लबने हल्ला केला होता हे उल्लेखनीय आहे.

मात्र, या काळात एकही गोळी झाडली गेली नाही.

गलवानमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर लगेचच भारतीय सैन्याने चिनी अपारंपरिक शस्त्रांना शह देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचा शोध सुरू केला होता.

Back to top button