माजी महापौर मंगला कदम यांच्याकडून सुनेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याचा आरोप | पुढारी

माजी महापौर मंगला कदम यांच्याकडून सुनेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याचा आरोप

पुणे/पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

कौटुंबिक कारणातून शिवीगाळ व मारहाण करून सुनेचा छळ केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर, विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांच्यासह पाच जणांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुशाग्र कदम, मंगला कदम, अशोक कदम, गौरव कदम, स्वाती कदम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत ३२ वर्षीय सुनेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २९ मे २०१८ ते २५ जून २०२० या कालावधीत संभाजीनगर पुणे येथे हा प्रकार घडला.

माजी महापौर मंगला कदम यांच्या मुलाला गंभीर आजार असल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती कुशाग्र कदम याला गंभीर आजार असल्याचे माहित असतानाही त्याने तो फिर्यादीपासून लपवून ठेवला. त्यानंतर डॉक्टरांशी संगणमत करून पतीला दुसरा आजार असल्याचे खोटे निदान करत फिर्यादींना मुल होण्यासाठी आयव्हीएफ पद्धतीने उपचार केले. तसेच पतीने वेळोवेळी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

Back to top button