‘NCB’ : ठोस पुराव्‍यांच्‍या आधारेच आम्‍ही कारवाई केली : समीर वानखेडे | पुढारी

'NCB' : ठोस पुराव्‍यांच्‍या आधारेच आम्‍ही कारवाई केली : समीर वानखेडे

मुंबई : पुढारी ऑनलाईन

‘नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरो’ (NCB) ही तपास संस्‍था ठोस पुरावे असल्‍याशिवाय  कारवाई करत नाही. आमच्‍यावरील सर्व आरोप निराधार आणि दुर्दैवी आहेत. आम्‍ही न्‍यायालयासमोर सर्व तपास तपशील देत आहोत, त्‍यामुळे आम्‍ही क्रूझवरील ड्रग्‍ज पार्टीवर केलेली कारवाई कायदान्‍वयेच केली आहे, अशी शब्‍दात ‘नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरो’चे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आज आपली भूमिका स्‍पष्‍ट केली.

क्रूझवरील ड्रग्‍ज पार्टीवर एनसीबीने केलेल्‍या कारवाईबाबत मंत्री नबाव मलिक यांनी काही प्रश्‍न उपस्‍थित केले होते. तसेच आज सकाळी पत्रकार परिषदत घेवून नबाव मलिक यांनी पुन्‍हा एकदा एनसीबीच्‍या कारवाईवर प्रश्‍नचिन्‍ह उभा केले हाेते.

या कारवाई संदर्भात बोलताना वानखेडे म्‍हणाले की, आम्‍ही ठोस पुराव्‍यांच्‍या आधारेच कारवाई केली आहे. एनसीबी ९ साक्षीदारांना घेवून ही कारवाई केली. या प्रकरणी तपास सुरु आहे. या तपासाची आम्‍ही माहिती देवू शकत नाही. तसेच आम्‍ही न्‍यायालयासमोर सर्व तपास तपशील देत आहोत, त्‍यामुळे आम्‍ही सर्व कारवाईही कायदान्‍वयेच केली आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्‍यात आलेली आहे. याप्रकरणी ११ जणांना अटकच झालेली नाही. एनसीबीने सर्व कारवाई ही नियमानुसार केली आहे, असेही ते म्‍हणाले.

‘क्रुझवरील ११ लोकांना ताब्यात घेतले, तर त्या ३ जणांना NCB ने का सोडले? : नवाब मलिक

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सकाळीएनसीबीवर गंभीर आरोप केले हाेते. त्यांनी व्हिडिओ सादर करून भाजपवर हल्ला चढवला. समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स तपासा, अशी मागणीही त्यांनी केला होती. त्यांचे दिल्लीत कोणाशी संबंध आहेत? अशी विचारणा त्यांनी केली होती.

क्रुझवरील पार्टीत भाजप नेत्यांच्या मेहुण्याचा समावेश होता, असा दावा नवाब मलिक यांनी केला. रुषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला आणि प्रतीक गाभाला का सोडण्यात आले, अशी विचारणा त्यांनी केली. क्रुझवरील ११ लोकांना ताब्यात घेतले, तर त्या ३ जणांना NCB ने का सोडले? असे ते म्हणाले. रिषभ सचदेव हा मोहित भारतीय यांचे मेहुणे असल्याचे ते म्हणाले.

रिषभ सचदेव हा भारतीय युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष असल्याचा दावा मलिक यांनी केला. एनसीबीने केलेली कारवाई चुकीची असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. एनसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचा हा डाव आहे, या डावामध्ये भाजपचा सहभाग असल्याचा आरोप त्‍यांनी केला होता.

हेही वाचलं का?

 

Back to top button