हातातील खंजीर बाजूला ठेवून बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घ्यायला या : संजय राऊत | पुढारी

हातातील खंजीर बाजूला ठेवून बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घ्यायला या : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : हातातील खंजीर बाजूला ठेवून बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घ्यायला या, अशा शब्‍दांमध्‍ये शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी दिल्‍लीतील श्रद्‍धा वालकर हत्‍या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्‍हावी, अशी मागणी त्‍यांनी केली.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन १७ नोव्हेंबरला आहे. शिंदे गटाचे नेते यानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्‍या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. याबाबत विचारणा केल्‍यानंतर(Sanjay Raut) खा. राऊत म्‍हणाले,  “स्मृतीस्थळावर हातातील खंजीर बाजूला ठेवून बाळासाहेंबाचा आशिर्वाद घ्यायला या. नतमस्तक व्हा. चांगल्या मनाने या.”

श्रद्धा वालकर निर्घृण हत्‍या प्रकरणी ते म्हणाले, “ज्या पद्धतीने श्रद्धाचा खून करण्यात आला. ते खूपच भयानक आहे. त्या मुलीच्या बापाची मुलाखत मी वाचली. त्यामध्ये त्या बापाचा भयंकर आक्रोश आहे. अशा लोकांना म्हणजे जे खुनी आहेत त्यांच्यावर खटले न चालवता त्यांना चौकात फासावर लटकवायला हवं.  सर्व मुलींनी सावध राहायला पाहिजे. हे मी फक्त महाराष्ट्रातील मुलींच्या संदर्भात म्हणतं नाही तर सर्व मुलींच्या बाबतीत म्हणतं आहे. त्या मुलाने जे काही केलं आहे ते  विकृतीच्याही पुढचं आहे. आपण कोणत्या समाजात राहतो हा प्रश्न पडतो. या प्रकरणाचं कोण राजकारण करतं असेल तर तेही एक प्रकारे दोषीच आहेत, असेही या वेळी राऊत म्‍हणाले.

हेही  वाचा

 

Back to top button