भाजप आमदार राम कदम : जावेद अख्तर यांचा एकही चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : भाजप आमदार राम कदम यांनी लेखक जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर टिका केली आहे. जावेद अख्तर जोपर्यंत वक्तव्य मागे घेत नाहीत तोपर्यंत त्यांचा एकही चित्रपट प्रदर्षीत होऊ देणार नसल्याचे भाजप आमदार राम कदम म्हणाले आहेत.
राम कदम ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत म्हणाले, जावेद अख्तर यांचे हे विधान केवळ लज्जास्पदच नाही, तर संघ आणि विश्व हिंदू परिषदेसाठी वेदनादायक आणि अपमानास्पद आहे.
- सीएम बंगल्यात, मंत्री मंत्रालयाकडे फिरकेनात, सनदी अधिकारीही गायब, प्रशासन ठप्प
- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भेग!
आरएसएससारखी संस्था गरीबांची सेवा करते. परंतु जावेद अख्तर यांनी जे वक्तव्य केले ते अपमानजनक आहे. देशात एका विचारधारेचे सरकार आहे राज धर्माचे पालन करण्यासाठी हे सरकार कायम कटिबद्ध आहे.
जर देशात सत्तेत असलेले सरकार आरएसएसच्या विरारधारेवर चालत असेल तर त्यांची तुलना तालिबानशी करणे चुकीचे आहे. अख्तर यांनी केलेले वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे. असे राम कदम म्हणाले.
#संघ तथा #विश्वहिंदूपरिषद के करोडों कार्यकर्ताओ की, जब तक हाथ जोड़कर #जावेदअख्तर माफी नही मांगते. तब तक उनकी तथा उनके परिवार की कोई भी #फिल्म इस #माभारती के भूमि पर नहीं चलेगी. pic.twitter.com/ahWgVQWuvH
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) September 4, 2021
काय म्हणाले होते जावेद अख्तर…
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबान्यांवर टीका करताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघावरही टीकास्त्र साेडले आहे. तालिबानी हे भंयकर आहेत आणि त्यांची कृती निंदनीयच आहे, मात्र राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारेही तालिबान्यांसारखेच आहेत, असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.
संकुचित विचार करणारे तालिबानचे समर्थक
एका वृत्तवाहिनीतील चर्चेवेळी जावेद अख्तर म्हणाले की, तालिबान आणि तालिबान सारखेच होण्याची इच्छा हा एकसारखाच विचार आहे.
भारतातील काही मुस्लिमांनी तालिबान्यांचे समर्थन केले आहे. मात्र ही संख्या खूपच कमी आहे.
देशातील मुस्लिम युवकांना रोजगार, शिक्षण आणि चांगल्या शाळा हव्या आहेत.
मात्र काही संकुचित विचार करणारे तालिबानचे समर्थन करत आहेत. महिलांना गौण स्थान दिले जाते.
हा विचारच तुम्हाला मागे घेवून जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
तालिबानचा विचार भारतीयांना आकर्षित करणार नाही
तालिबान आणि जगातील अन्य ठिकाणी धर्माच्या आधारे राष्ट्र स्थापन करण्याचे स्वप्न पाहणार्यांची मानसिकता एक सारखाच आहे.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ( आरएसएस) , विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारेही तालिबान्यांसारखेच आहेत.
भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. बहुसंख्य नागरिक धर्मनिरपेक्ष आहेत.
तालिबानचा विचार कोणत्याही भारतीय नागरिकांना आकर्षित करणार नाही.
या देशातील बहुतांश नागरिक हे सभ्य आणि सहनशील आहेत. या विचारांचा सन्मान होण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
- जळगाव : पीक विमा प्रकरणी बँक अधिकाऱ्यावर गुन्हा
- जयंत पाटील राजू शेट्टी यांच्या आमदारकीबाबत म्हणाले…
- मुंबई : नायर रुग्णालयास १०० कोटींच्या निधीची घोषणा