डोंबिवली : परप्रांतीय भाजी विक्रेत्यांची मराठी भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण | पुढारी

डोंबिवली : परप्रांतीय भाजी विक्रेत्यांची मराठी भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर परप्रांतीय फेरीवल्याकडून प्राणघातक हल्ला केल्याने फेरीवाल्यांची दादागिरी वाढत असल्याचे दिसत आहे. डोंबिवली मध्ये परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी एका मराठी भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील गोळवली येथे राहणारे कमलाकर पाटील हे डोंबिवली पूर्वेकडील राजेश ज्वेलर्स दुकान परीसरातील भाजी मार्केट गल्ली मध्ये भाजी विक्री करतात.

सांगरली येथे राहणारे परशुराम मल्याली, जयेश मल्याली, सुभाष मल्याली आणि विष्णू मल्याली हे देखील पाटील दाम्पत्यांच्या बाजूला भाजी विकायला बसले होते. कमलाकर पाटील यांच्या पत्नीने या चौघांना ओरडून भाजी विकू नका असं सांगितले. या गोष्टीचा राग मनात ठेवून या चौघांनी त्यांना शिवीगाळ करत पाटील यांना लाकडी बांबूने व ठोशाबुक्याने मारहाण केली.

या घटनेमुळे पुन्हा एकदा डोंबिवली शहरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी मारहाण केल्याने दादागिरी वाढल्याचे दिसून आले.

हे ही वाचलत का :

#26/11 : फ्रंटलाईन वर्करच्या भूमिकेत असणाऱ्या डॉ. सुजाता म्हणजेच मृण्मयी देशपांडेचा अनुभव

 

Back to top button