यूपी विधानसभा निवडणूक: उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार? | पुढारी

यूपी विधानसभा निवडणूक: उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२२ मध्ये होणाऱ्या यूपी विधानसभा निवडणूक निकालात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ हेच बाजी मारतील असा दावा सर्व्हेमध्ये केला आहे. सत्ता काबीज करत असताना २५९ ते २६७ जागा मिळण्याची शक्यता एबीपी आणि सी वोटर यांच्या सर्व्हेमध्ये सांगण्यात आले आहे.

समाजवादी पार्टीला १०० जागांवर तर काँग्रेस एक अंकी जागा मिळवेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

उत्तरप्रदेश निवडणुकीत सत्ताधारी भाजप, विरोधी पक्ष समाजवादी पार्टी, बसप आणि काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.

रॅली, सभा आणि अन्य कार्यक्रमांमधून निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत.

अशात एबीपी आणि सी वोटर ने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे केला आहे.

यात पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सर्व्हेनुसार भाजप आणि मित्रपक्षांना ४२ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

तर समाजवादी पक्षाला ३० टक्के, बहुजन समाज पक्षाला १६ तर काँग्रेसला ५ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेशात भाजप हाच मोठा पक्ष असेल. भाजपला २५९ ते २६७ जागा मिळू शकतात.

समाजवादी पक्षाला १०९ ते ११७, बसपला १२ ते १६ जागा तर काँग्रेसला ३ ते ७ जागा आणि अपक्षांना ६ ते १० जागा मिळू शकतील.

योगींच्या कामावर ४४ टक्के लोक खूश

यूपी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर केलेल्या सर्व्हेमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या कामावर किती लोक खूश आहेत याचा सर्व्हे करण्यात आला.

यात ४४ टक्के लोक खूश, १८ टक्के नाराज तर ३७ टक्के लोक असंतुष्ट असल्याचे समोर आले आहे. एक टक्के लोकांनी सांगता येत नाही असा शेरा दिला आहे.

भावना गवळी यांच्या वाशिमधील संस्थेत ईडीची धाड

धक्कादायक: उंदराने घेतला रेल्वे कर्मचाऱ्याचा जीव; डोळे कुरतडल्याने मृत्यू

नेतृत्वबदलाला दिले होते आव्हान

योगी आदित्यनाथ यांच्या कामकाजाला भाजपमधून मोठा विरोध झाला होता. त्यामुळे राज्यात नेतृत्वबदल होईल, असे सांगण्यात येत होते.

त्यामुळे योंगींनी दिल्लीवारी केली होती. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आदी नेत्यांची त्यांनी भेट घेतली.

त्यानंतर त्यांच्यावरील बालंट टळले. योगी आदित्यनाथ यांचा चेहरा घेऊनच उत्तरप्रदेशात निवडणुका लढविल्या जातील हे आता स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: 

Back to top button