ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक संपली; निवडणूका पुढे ढकलणार? | पुढारी

ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक संपली; निवडणूका पुढे ढकलणार?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक संपली : ओबीसी आरक्षणावरून सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ठोस निर्णय झालेला नाही.

या बैठकीनंतर बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी डेटा मिळवण्यासाठी न्यायालयात गेलो असल्याचे सांगितले. त्यावर लवकरच निर्णय होईल असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मागासवर्ग आयोगाकडून इम्पिरिकल डेटा तयार करून घेण्यावर एकमत झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये यावर एकमत झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूका पुढे ढकलणार का? अशी चर्चा रंगली आहे.

Back to top button