Hindutva : "ना गणेशोत्सवाच्या, ना दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा; मोहीत कंबोज यांनी हिंदुत्वावरुन उद्धव ठाकरेंना डिवचलं  | पुढारी

Hindutva : "ना गणेशोत्सवाच्या, ना दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा; मोहीत कंबोज यांनी हिंदुत्वावरुन उद्धव ठाकरेंना डिवचलं 

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते  मोहीत कंबोज  (Mohit Kamboj) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हिंदुत्वावरुन डिवचंल आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरुन (Hindutva) निशाणा साधला आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छावरुन टीका केली आहे.

Hindutva : “ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, ना दहीहंडी उत्सवाच्या

भाजप नेते  मोहीत कंबोज  (Mohit Kamboj) यांनी आज (शनिवार, १० सप्टेंबर) सकाळी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  “उद्धव ठाकरे यांनी यंदा महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ना दहीहंडी उत्सवाच्या, अडीच वर्षांनंतर हिंदूंनी दोन्ही सण ज्या उत्साहात साजरे केले त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मनःपूर्वक आभार!” असे ट्विट करत त्यांनी ते उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

Hindutva : याकूब मेमन कुटुंबाचा दबाव हिंदुत्वापुढे जास्त होता 

मोहीत कंबोज यांनी आणखी एक ट्विट करत उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छांवरुन डिवचले आहे. “याकूब मेमन कुटुंबाचा दबाव हिंदुत्वापुढे जास्त होता, असे दिसते. कदाचित याच कारणामुळे त्यांनी समाधी बनवण्यात उघडपणे मदत केली, पण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या किंवा त्यांच्या विसर्जनाच्या आनंदाबद्दल ट्विटही केले नाही. म्हणूनच लोक म्हणत आहेत इथे- गणपती बाप्पा मोरया, दुसरीकडे,  याकुबच्या प्रेमात!

हेही वाचलंत का?

Back to top button