राजनाथ सिंह यांच्या शिवरायांविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद | पुढारी

राजनाथ सिंह यांच्या शिवरायांविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद

पुणे; पुढारी ऑनलाईन : राजनाथ सिंह : जेथे नीरजने दररोज कसून सराव केला आणि ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी घातली, त्या मैदानालाच ‘नीरज चोपडा स्टेडियम’ असे नाव देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी घोषित करताच नीरजचे डोळे पाणावले आणि लष्कराच्या तिन्ही दलांतील जवानांचा उर अभिमानाने भरून आला.

यावेळी ऑलिम्पिक व जागतिक पातळीवर विविध खेळांत विशेष कामगिरी बजावणार्‍या 23 खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान या कार्यक्रमावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी या कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिल्याचे वक्तव्य केले. आता या वक्तव्यानंतर वादंग माजले आहे.

संभाजी ब्रिगेड तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राजनाथ सिंहांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी चुकीच्या ऐकीव माहितीवर किंवा चुकीच्या फीडवर त्यांनी विधान केलं असावे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

संभाजी ब्रिगेडही आक्रमक

राजनाथ सिंह यांनी चुकीचा इतिहास लष्कराच्या कार्यक्रमांमध्ये अज्ञानाचे दर्शन दिले आहे. राजनाथ सिंह यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अज्ञान आहे. खोटा इतिहास सांगणाऱ्यांनी शिवरायांच्या इतिहासाची गद्दारी करू नये, अशी आक्रमक भूमिका संभाजी ब्रिग्रेडने मांडली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button