पैठण; चंद्रकांत अंबिलवादे : बंडखोर आमदारांच्या दहशतीपुढे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पैठण शहरातील चौकामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एकही बॅनर झळकले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे दरवर्षी मोठे बॅनर लावण्यात येतात. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे मोठा संघर्ष निर्माण झाल्यामुळे यावर्षी शुभेच्छांचे बॅनरच नाहीत.
आज बुधवार दि.२७ जुलै रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जोतो. दरवर्षी पैठण येथील बालकिल्ल्यामध्ये सामाजिक उपक्रमांसह शिवसैनिक सोशल मीडिया व वेगवेगळ्या माध्यमातून पक्षप्रमुखांना शुभेच्छा देण्यासाठी स्पर्धा करीत होते. परंतु सध्या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व समर्थकांमध्ये खरी शिवसेना आमचीच असा वाद समोर आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक, खंडोबा मंदिर, मार्केट कमिटी परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढदिवसाचे बॅनर झळकत असतात. परंतु ठाकरेंची सेना सोडून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या दहशतीपुढे पैठण शहरातील यंदा मात्र त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकलेच नसल्याचे पूर्वसंध्येला दिसून आले.
दरम्यान पैठण येथील सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त्य एक आवाहन केले. हे आवाहन शिवसैनिकांनी सोशल मीडियावर नाव न टाकता करण्यात आलेले आहे. बुधवार रोजी सकाळी १० वाजता कहारवाडा येथील मारूती मंदिरामध्ये महाआरती करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा