मुंबई : मंत्रिपदासाठी आमदाराकडे मागितले १०० कोटी, धक्कादायक प्रकार आला समोर | पुढारी

मुंबई : मंत्रिपदासाठी आमदाराकडे मागितले १०० कोटी, धक्कादायक प्रकार आला समोर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरु आहेत. याच दरम्यान, दौंड येथील एका आमदाराला १०० कोटी रुपयांच्या बदल्यात मंत्रिपदाची ऑफर देणाऱ्या चौघांना मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai crime branch) अटक केली आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार राहुल कुल यांच्या तक्रारीनुसार खंडणी विरोधी सेलने चौघांना जेरबंद केले आहे. राहुल कुल हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून दौंड मतदारसंघातून निवडून आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुल यांचे स्वीय सहाय्यक बाळकृष्ण थोरात यांना १६ जुलै रोजी रियाझ शेख या व्यक्तीचा फोन आला. रियाझ म्हणाला की, त्याला कुल यांना भेटून ऑफरवर चर्चा करायची आहे. रियाझने आपण दिल्लीचा असल्याचे सांगत आपली खूप मदत होऊ शकते, अशी बतावणी केली. त्यानंतर नरिमन पॉइंट येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार कुल यांनी रियाझची भेट घेतली.
या बैठकीत रियाझने कुल यांना सांगितले की तो एका वरिष्ठ राजकीय नेत्याच्या संपर्कात आहे, जो १०० कोटी रुपयांमध्ये मंत्रिपद देण्याची व्यवस्था करू शकतो. त्यानंतर आमदार कुल यांनी सौदेबाजीचे नाटक करत ९० कोटींवर सौदा करण्याचे मान्य केले.

भाजप आमदार राहुल कुल यांनी या घटनेची माहिती मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना दिली होती. या माहितीच्या आधारावर खंडणीविरोधी पथकाने ओबेरॉय हॉटेलमध्ये चौघांना पकडले. आमदार कुल यांच्यासमोरच ही कारवाई करण्यात आली.

 हे ही वाचा :

Back to top button