आम्ही दहिहंडी सण साजरा करणारच: अविनाश जाधव | पुढारी

आम्ही दहिहंडी सण साजरा करणारच: अविनाश जाधव

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संसर्ग असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाही दहिहंडी सण साजरा करण्यास मनाई असल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दहिहंडी पथकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

जोगेश्वरीतील उपनगरचा राजा अशी ओळख असलेल्या जय जवान गोविंदा दहिहंडी मंडळाच्या वतीने सोमवारी (दि.२३) रोजी रात्री निषेध करत पथकाने ७ थर लावले. या निषेधार्थ आंदोलनात मनसेचे नेते अविनाश जाधव हे सहभागी झाले होते.

अविनाश जाधव यांनी याबाबत म्हटले आहे की, दहिहंडी सण साजरा करणाऱ्या मुले सामान्य कुटुंबातील आहेत. ते कुठे पब आणि नाईट पार्टीला जात नाहीत. यामुळे त्याचा आनंद दहिहंडी सण साजरा करण्यात असतो. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदा दहिहंडी सणवर बंदी घातली आहे. हे बरोबर नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

युवासेनेच्या कार्यक्रमाला बंदी नाही आणि दहिहंडी सणावर बंदी हे चुकीची आहे.

दहीहंडी सण साजरा करण्यावर जरी बंदी असली तरीही आम्ही दहिहंडी सण साजरा करणार असल्याचे देखील ते म्हणाले.

आम्ही दहिहंडी सणाचं आयोजन करणार

तसेच गोविंदाच्या मनात उत्साह आहे. माननीय राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दहिहंडी सणाचं आयोजन करणार आहोत. यामुळे दहिहंडी बंदीवर गोविंदा पथकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

हिंदू सण वर्षातून एकदा येतो याच्यावर बंदी का घालण्यात येते. राजकारण्यांच्या कार्यक्रमाला बंदी नाही. फक्त दहीहंडीला बंदी का? असा प्रश्न देखील येथे उपस्थित केला गेला आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा: कोल्हापूर : सामाजिक जाणिवेतून अंध बांधवांची आरोग्य तपासणी

Back to top button