भाविकांवर काळाचा घाला: २ ठार, ८ जखमी | पुढारी

भाविकांवर काळाचा घाला: २ ठार, ८ जखमी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव येथील भाविकांवर काळाने घाला घातला. जळगाव अपघातात २ जण ठार तर ८ जखमी झाले. मध्य प्रदेशातील शिरवेल येथील महादेवाचे दर्शन घेऊन भाविक परताना ही दुर्घटना घडली. भाविक जळगाव येथील आहेत.

मालवाहू वाहनाला झालेल्या अपघातात जळगाव शहरातील दोन भाविक ठार. तर आठ जण जखमी झाले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी,  शहरातील कांचननगर भागातील काही जण (एमएच१९ सीवाय-५३१५) दर्शनाला गेले होते. मालवाहू वाहनाने मध्यप्रदेशातील शिरवेल येथील महादेवाच्या दर्शनाला ते गेले होते.

दर्शन करून रात्री परत येत असताना पालजवळ ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. त्यांच्या वाहनाने झाडाला धडक दिली. यानंतर हे वाहन पलटी झाले.

या अपघातात प्रशांत साहेबराव तांदुळकर (वय ३६, रा. कांचननगर जळगाव) आणि गोलू बंडू परदेशी (वय २६, रा कांचननगर) हे जागीच ठार झाले.

अजय सुनिल वाल्हे (वय २१), गणेश रविंद्र सोनवणे (वय २३), परेश निंबा सोनवणे (वय २६), चेतन रविंद्र मोरे (वय २३), पवन रविंद्र मोरे (वय २२), महेश गोविंदा सोनवणे ( वय २१), गजानन रमेश पाटील (वय २४) व चालक विक्की अरूण चौधरी (वय २५) हे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

हेदेखील वाचा-

Back to top button