युवा सेनेने राणेंच्‍या नावाचा ठाणे मेंटल हॉस्पिटल मध्ये काढला केस पेपर… | पुढारी

युवा सेनेने राणेंच्‍या नावाचा ठाणे मेंटल हॉस्पिटल मध्ये काढला केस पेपर...

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्राबरोबर ठाण्यातही उमटले आहे. ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल बाहेर युवा सेनेच्या वतीने हातात कोंबड्या घेऊन आंदोलन करण्यात आले. तसेच मेंटल हॉस्पिटल मध्ये नारायण राणेंच्‍या नावाने केस पेपर काढला.

युवा सेनेने ठाणे मेंटल हॉस्पिटल मध्ये राणेंच्‍या नावाचा केस पेपर काढला आहे.

नारायण राणे यांच्या नावाचा मेंटल हॉस्पिटलमध्ये केस पेपर देखील काढण्यात आला असून त्यांच्या उपचारांचा सर्व खर्च शिवसेना उचलेल असा उपरोधिक टोला शिवसेनेने लगावला आहे. दरम्यान, राणे यांच्या विरोधात महापौर आणि
आणि शिवसैनिक गुन्हे दाखल करण्यासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात गेले आहेत.

अटकेनंतर उपराष्ट्रपतींना लेखी कळवणार : नाशिक पोलिस आयुक्‍त

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून नाशिक शहर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता नारायण राणे यांना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पोलीस उपायुक्त संजय बारकंडु यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या पथकात गुन्हे शाखा युनिट एकच पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांचा समावेश आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्‍त पांडे यांनी दिली.

नाशिकमधील भाजप कार्यालयाची तोडफोड

मंगळवारी सकाळी शिवसैनिकांनी भाजपच्या वसंतस्मृती या कार्यालयावर हल्‍ला केला. नारायण राणे यांनी केलेल्‍या विधानाचा निषेध करत कार्यालयात तोडफोड केली. या परिसरात तणाव निर्माण झाला असून परिसरात पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button