'नारायण राणे यांच्याविरोधात महाडमधील शिवसैनिकांत उद्रेक' | पुढारी

'नारायण राणे यांच्याविरोधात महाडमधील शिवसैनिकांत उद्रेक'

महाड; प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केले.  महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उद्रेक निर्माण झाला आहे. यापुढे नारायण राणे यांनी महाडमधून जाऊ नये, असा इशारा महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेले कालचे वक्तव्य खालच्या पातळीवरील आहे. राणे यांना हे शोभत नाही, असेही गाेगावले म्‍हणाले.  शिवसैनिकआज छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाड येथे शिवसेनेच्या पध्दतीने समाचार घेतील, असेही ते म्‍हणाले.

चिपळूणात पोलीस बंदोबस्त वाढविला

दरम्यान, चिपळूणात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री राणे यांच्‍या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दिली आहे. राणे यांना अटक करून न्यायालयासमोर हजार करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्‍यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक चिपळूणकडे रवाना झाले आहे. दरम्‍यान, चिपळुणमध्‍ये पोलिस बंदोबस्‍त वाढविण्‍यात आला आहे. वालोपे येथील रिमझ हॉटेलला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

आ. भास्कर जाधव संगमेश्वरहून रत्नागिरीकडे रवाना  

राणे यांना अटक करून न्यायालयासमोर हजार करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. दरम्‍यान, शिवसेनेचे आमदार भास्‍कर जाधव हे संगमेश्वरहून रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. दरम्‍यान, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी हे नारायण राणे यांच्‍याबरोबर चर्चा करणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

काय म्हणाले होते राणे…

‘किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे, हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला, किती चीड येणारी गोष्ट आहे,’अशी टीका राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.

राणे यांच्यावर केवळ राजकीय सुडापोटी कारवाई : चंद्रकांत पाटील

राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकत नाही.

प्रत्येकाची एक स्टाइल असते. राणेंचीदेखील बोलण्याची एक स्टाइल आहे. त्यात द्वेष नाही. पण केवळ राजकीय सुडापोटी राणेंवर कारवाई केली जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Back to top button