‘कुत्ते’ : विशाल भारद्वाज आणि लव रंजन आले एकत्र!

कुत्ते चित्रपट
कुत्ते चित्रपट
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : 'कुत्ते' या चित्रपटासाठी विशाल भारद्वाज आणि लव रंजन एकत्र आले आहेत. 'कुत्ते' हा चित्रपट लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स टी-सीरीजची प्रस्तुती आहे. त्याच्या निर्मितीसाठी एकत्र येत असल्याची घोषणा त्यांनी केली.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आसमान भारद्वाज करत आहेत. त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाची झलक सादर करण्याच्या उद्देशाने निर्मात्यांनी मोशन-पोस्टरचे अनावरण केले आहे.

प्रेक्षकांना एका रोमांचक सफरीचे वचन दिले आहे. अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदान, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हा थ्रिलर चित्रपट आहे. सध्या प्री-प्रोडक्शन स्टेजमध्ये आहे. साधारण २०२१ च्या शेवटी याच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. आसमान स्कूल ऑफ विजुअल आर्ट्स, एनवाईसीमधून आपले फिल्म मेकिंग पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

माझे वडील विशाल भारद्वाज यांना ' ७ खून माफ', 'मटरु की बिजली का मंन्डोला' आणि 'पटाखा' यांमध्ये मी असिस्ट केले आहे.
विशाल भारद्वाज म्हणाले, हा चित्रपट माझ्यासाठी विशेष आहे. कारण आसमान आणि मी दिग्दर्शक- निर्माता म्हणून पहिल्यांदाच एकत्र येत आहोत. तो यासोबत काय करणार आहे हे पाहायला मी उत्सुक आहे.

लव फिल्म्स-विशाल भारद्वाज फिल्म्स एकत्र

लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स देखील पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. मी या सहयोगासाठी देखील अतिशय उत्सुक आहे कारण, मी चित्रपट निर्मिती आणि मजबूत व्यावसायिक समझ यासाठी लव यांच्या धाडसी दृष्टीकोनाचे खरोखर कौतुक करतो.

मी माझ्या संपूर्ण करिअरमध्ये नसीर साहब, तब्बू, कोंकणा आणि राधिका यांच्यासोबत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आसमानने या सगळ्यांना या चित्रपटासाठी एकत्र आणले आहे.

आम्ही दर्शकांना हा मनोरंजक थ्रिलरपट मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी उत्सुक आहोत.

हा चित्रपट लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत तयार होणार आहे

. लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज यांची निर्मिती आहे.

गुलशन कुमार व भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारे प्रस्तुत करण्यात आली आहे.

चित्रपटाचे संगीत विशाल भारद्वाज करणार आहेत. गाणी गुलजार यांची आहेत.

हेही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news