मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मंत्रिमंडळ विस्ताराच्या आता हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत भाजपच्या श्रेष्ठींशी देखील चर्चा करणार आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळाचा फॉर्मुला निश्चित केला जाणार आहे. पुढच्या आठवड्यात हा विस्तार होण्याची शक्यता आहे.

४२ जणांच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाकडे सुमारे ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्री मिळून १५ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. तर भाजपचे साधारणतः २७ मंत्री असतील. मंत्रिमंडळातील सर्व जागा लगेच भरल्या जाणार नाहीत. काही जागा रिक्त ठेऊन हा विस्तार केला जाणार असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमख्यमंत्रीपदाची ३० जूनला शपथ घेतली. त्यानंतर ४ जुलै रोजी सरकारवरील विश्वासदर्शक ठराव जिंकला. आता शिंदे आणि फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करून नव्या जोमाने कामाला लागणार आहेत. १२ जुलैनंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार शिंदे गट व भाजपाच्या १५ ते २० आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते असे समजते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news