विधानपरिषदेच्या दहा नवनिर्वाचित सदस्यांचा उद्या शपथविधी | पुढारी

विधानपरिषदेच्या दहा नवनिर्वाचित सदस्यांचा उद्या शपथविधी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या १० सदस्यांचा शपथविधी समारंभ उद्या, शुक्रवार ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता विधान भवनात संपन्न होत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी पार पडेल.

मागील महिन्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठीचे निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. विधानसभा सदस्यांच्याद्वारे हे १० उमेदवार निवडले जाणार होते. या निवडणुकीत भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार विधान परिषदेवर निवडून गेले आहेत.

यामध्ये भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय हे उमेदवार निवडूण आले आहेत. तर शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे दोन तर राष्ट्रवादीचे रामराजे नाईक-निबांळकर आणि एकनाथ खडसे व काँग्रसकडून भाई जगताप हे विधान परिषदेवर निवडूण गेले आहेत.

नव निर्वाचित १० सदस्यांचा शपथविधी शुक्रवारी विधान भवनात संपन्न होणार आहे.

Back to top button