Sania Mirza Wimbledon 2022 : विम्बल्डन सेमीफायनलमध्ये सानिया मिर्झाचा पराभव | पुढारी

Sania Mirza Wimbledon 2022 : विम्बल्डन सेमीफायनलमध्ये सानिया मिर्झाचा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची स्टार टेनिस पटू सानिया मिर्झाने (Sania Mirza Wimbledon 2022) मिश्र दुहेरीच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर विम्बल्डनचा निरोप घेतला. सानिया आणि क्रोएशियाचा मॅट पेव्हिक यांच्या सहावे मानाकंन प्राप्त जोडीला ब्रिटनच्या कुपस्की आणि अमेरिकेच्या डेसिरे यांच्या जोडीने ४-६, ७-५ आणि ६-४ अशा सेटने पराभूत केले. ३५ वर्षांच्या सानिया मिर्झाने आतापर्यंत सहा ग्रँडस्लॅम किताब पटकावले आहेत. ज्यामध्ये तीन मिश्र दुहेरीचे किताब आहेत. पण, सानियाला अद्याप विम्बल्डन मधील मिश्र दुहेरी मधील एक ही किताब जिंकता आला नाही.

सानिया मिर्झाने (Sania Mirza Wimbledon 2022) २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि २०१२ मध्ये फ्रेंच ओपन महेश भूपती सोबत तर २०१४ साली ब्राझीलच्या ब्रुनो सुआरेस सोबत अमेरिकन ओपन जिंकला होता. सानिया गुरुवारी ट्वीट करुन म्हणाली, “आम्ही जेवढे आव्हान उभे केले जेवढा संघर्ष केला, आम्ही जे काम केले शेवटी तेच महत्त्वाचे आहे. पण, यावेळी विम्बल्डनमध्ये असे होऊ शकले नाही. मागील २० सालांपासून इथे खेळणे आणि जिंकणे हे सन्मानाप्रमाणेच आहे.”

सानिया (Sania Mirza Wimbledon 2022) आणि मॅट पेव्हिक यांनी पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ४-२ अशी आघाडी घेतली हेाती. पण, पुढील सहा मधील पाच गेममध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. निर्णायक सेटमध्ये सानिया आणि मॅट पेव्हिक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे सर्विसला निष्प्रभ केले. पण, ते अधिक काळासाठी दबाव बनवू शकले नाहीत. मॅट पेव्हिक याने १२ व्या गेममध्ये दोन वेळा डबल फॉल्ट केला. विम्बल्डन मधील मिक्स दुहेरीमध्ये सानिया मिर्झाचा आता पर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी होती.

Sania Mirza Wimbledon 2022

सानिया मिर्झा याआधी २०११, २०१३ आणि २०१५ मध्ये उपांत्यपूर्व पर्यंत धडक मारली होती. तीने विम्बल्डन २०१५ मध्ये मार्तिना हिंगिस सोबत महिला दुहेरीचा किताब जिंकला होता. सानिया मिर्झा हिने या वर्षीच्या सुरुवातील घोषणा केली होती की, ती २०२२ च्या सत्रानंतर टेनिस मधून निवृत्ती घेऊ.

Back to top button