मुंबई : प्रेमप्रकरणातून तिघींचा पाडला मुडदा अन् स्वतः केली आत्महत्या, चार सुसाईड नोट सापडल्या

मुंबई : प्रेमप्रकरणातून तिघींचा पाडला मुडदा अन् स्वतः केली आत्महत्या, चार सुसाईड नोट सापडल्या
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील कांदिवली पश्चिम भागात एकाच इमारतीत चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. कांदिवली पश्चिम येथे काल रात्री ही घटना घडली आहे. एका महिलेसह तिच्या दोन मुलींची हत्या करून चालक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने स्वतः आत्महत्या केली आहे. प्रेमप्रकरणातून महिला आणि त्यांच्या दोन मुलींची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना (Kandivali Police) संशय आहे. ज्या महिलेची हत्या करण्यात आली ती एका डॉक्टरची पत्नी असल्याचे समजते.

किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी चार मृत व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांना घटनास्थळी चार सुसाईड नोट सापडल्या आहेत. चारही मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम येथील देना बँक जंक्शन येथे एक व्यक्ती हातात विळा घेऊन फिरत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. सदर व्यक्ती २ महिलांना घेऊन दळवी रुग्णालयाच्या इमारतीत जात असताना काही रहिवाशांनी पाहिले होते. या माहितीनंतर कांदिवली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिसरात शोध घेतला. पोलिसांना रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोन महिलांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर परिसराची झडती घेतली असता पहिल्या मजल्यावर दोन व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

मृत चालकाच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून त्यात भूमी दळवी या महिलेचा उल्लेख केला आहे. तिच्या प्रेमामुळे तिघा महिलांची हत्या केली आणि गळफास घेतल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news