नुपूर शर्मांना पाठिंब्याची पोस्ट टाकणार्‍याचा गळा चिरून खून | पुढारी

नुपूर शर्मांना पाठिंब्याची पोस्ट टाकणार्‍याचा गळा चिरून खून

उदयपूर : वृत्तसंस्था :  मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वक्‍तव्यप्रकरणी भाजपच्या प्रवक्‍तेपदावरून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ दहा दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यावरून एका टेलरचा खून करण्यात आला. मारेकर्‍यांनी टेलरचा गळा चिरला. त्यावेळेला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकीही दिली.

गेल्या काही दिवसांपासून त्याला धमक्या मिळत होत्या. पोलिसात त्याने फिर्यादही दिली होती. मंगळवारी दिवसाढवळ्या दुकानात शिरून गुंडांनी त्याच्यावर तलवारीने अनेक वार केले. नंतर गळा चिरला. घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.

तलवारीने सपासप वार करून गळा चिरला

कन्हैयालाल (40) असे मृताचे नाव असून, त्यांच्या दुकानात कपड्याचे माप देण्याच्या बहाण्याने मंगळवारी दुपारी मोटारसायकलवरून दोन गुंड दाखल झाले. काही कळण्याच्या आतच कन्हैयालाल यांच्यावर त्यांनी एकापाठोपाठ वार केले आणि त्याचा गळा चिरला. घटनास्थळीच कन्हैयालाल यांचा मृत्यू झाला. धमक्यांमुळे त्यांनी 6 दिवसांपासून दुकानही उघडले नव्हते. दुकान उघडताच होत्याचे नव्हते झाले. हत्येच्या विरोधात व्यापार्‍यांनी उदयपुरात बंद पुकारला होता.

पंतप्रधान मोदी यांना धमकी

रियाज अंसारी आणि मोहम्मद गौस या दोन्ही आरोपींना सायंकाळी अटक करण्यात आली आहे. दोन्ही उदयपूरचेच रहिवासी आहेत.दोघांनी संपूर्ण हत्याकांडाचा व्हिडीओ बनविला आणि या व्हिडीओतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धमकी दिली आहे. कन्हैयालालचा गळा चिरताना ‘देखो मोदी हम क्या कर रहे है’ अशा शब्दात मारेकर्‍यांनी मोदी यांना धमकी दिली. एनआयए या घटनेकडे दहशतवादी कृत्य म्हणून बघत असून, एनआयएचे अधिकारी आरोपींचा जबाब घेण्यासाठी उदयपूरला रवाना झाले आहेत.

दोन्ही आरोपींना अटक

रियाज अंसारी आणि मोहम्मद गौस या दोन्ही आरोपींना सायंकाळी अटक करण्यात आली आहे. दोन्ही उदयपूरचेच रहिवासी आहेत.दोघांनी संपूर्ण हत्याकांडाचा व्हिडीओ बनविला आणि या व्हिडीओतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धमकी दिली आहे. एनआयए या घटनेकडे दहशतवादी कृत्य म्हणून बघत असून, एनआयएचे अधिकारी आरोपींचा जबाब घेण्यासाठी दिल्लीहून उदयपूरला रवाना झाले आहेत. घटनेनंतर संपूर्ण राजस्थानात जमवाबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

Back to top button