राजकीय बंड : ‘पंतप्रधान तुकारामांच्या भेटीला आले, अन् एकनाथाला घेऊन गेले’; छगन भुजबळांची मिश्किल प्रतिक्रिया

छगन भुजबळ
छगन भुजबळ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले, अशी मिश्किल प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना दिली. सध्या राज्यात सुरू असलेले राजकीय नाट्य आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाविरूद्ध केलेल्या बंडावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.

ते म्हणाले की, मध्यावधी निवडणुकांसदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे यावर मी काही बोलू शकत नाही. संजय राऊत यांनी केलेले ट्विट मी पाहायलं नाही. सध्या यावर मार्ग काढण्यासंदर्भात पवार साहेबांशी चर्चा होईल. कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास, आम्ही सामोरे जायला तयार आहोत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पक्षाने निवडणुकीसाठी तयार रहावे, असेही मत  राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news