जास्‍तीत जास्‍त काय होईल? सत्ता जाईल ना? : संजय राऊत यांचा सवाल | पुढारी

जास्‍तीत जास्‍त काय होईल? सत्ता जाईल ना? : संजय राऊत यांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
शिवसेनेत फूट पडली म्‍हणून विरोधकांनी आनंदून जावू नये किंवा तशी तशी स्‍वप्‍नही पाहून नयेत शिवसेना एक कुटुंब आहे. हा घरातील विषय आहे. आमचा नाराज एकनाथ शिंदे यांच्‍याशी संवाद सुरु आहे. सर्वांना शिवसेनेबरोबरच राहयचे आहे. काही गैरसमज झाले आहेत ते दूर केले जातील. यातून जास्‍तीत जास्‍त काय होईल तर सरकार कोसळेल, सत्ता जाईल एवढच ना? असा सवाल करत शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे सत्ता येत असते आणि जात असते. आमची प्रतिष्‍ठा महत्त्‍वाची आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज स्‍पष्‍ट केले.

सर्व मतभेद दूर केले जातील

माध्‍यमांशी बोलताना राऊत म्‍हणाले की, एकनाथ शिंदे हे कट्‍टर शिवसेनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेपासून त्‍यांनी
सातत्‍याने शिवसेनेचे काम केले आहे. आम्‍ही अनेक वर्ष एकत्र आहोत. त्‍यांनी पक्ष सोडणे एवढे सोपे नाही. आम्‍हालाही ते परवडणारे नाही. कोणतेही मतभेद असतीनल ते दूर केले जातील.

एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार स्‍वगृही परततील

आज सकाळीच एकनाथ शिंदेशी बोलणे झाले. आमचा संवाद सुरु आहे. लवकरच एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार स्‍वगृही परततील, असा विश्‍वासही संजय राऊत यांनी व्‍यक्‍त केला. राष्‍ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर आम्‍ही सरकारमध्‍ये आहोत. त्‍यामुळे भाजपबरोबर आम्‍ही सरकार स्‍थापन करणार हा प्रश्‍नच होत नाही, असे स्‍पष्‍ट करत राज्‍यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी यांचे सरकारच राहिल. ठाकरे सरकार कोसळणार नाही, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

 

 

 

Back to top button