पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने, असे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारणात काय होईल याबद्दल तर्कवितर्क केले जात असताना राऊत यांचे हे ट्विट महत्वाचे मानले जात आहे. त्यांच्या या ट्विटमुळे मध्यावधी निवडणुकीचे संकेत मिळत आहेत.
शिवसेनेत फूट पडली म्हणून विरोधकांनी आनंदून जावू नये किंवा तशी तशी स्वप्नही पाहून नयेत शिवसेना एक कुटुंब आहे. हा घरातील विषय आहे. आमचा नाराज एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद सुरु आहे. सर्वांना शिवसेनेबरोबरच राहयचे आहे. काही गैरसमज झाले आहेत ते दूर केले जातील. यातून जास्तीत जास्त काय होईल तर सरकार कोसळेल, सत्ता जाईल एवढच ना? असा सवाल करत शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे सत्ता येत असते आणि जात असते. आमची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले होते .
हे वाचलंत का?