पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधूमाळी सुरु आहे. दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपचे आमदार मतदान करत आहेत. दहा जागांसाठी शिवसेनेचे दोन, काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे दोन, भाजपचे पाच असे अकरा उमेदवार असल्याने या निवडणूकीला चांगली रंगत आली आहे. प्रत्येक पक्ष दावा करत आहे की, आपलेच उमेदवार अधिकाधिक मतांनी निवडून येतील. राज्यसभेतील भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या सूचक ट्विटने या निवडणुकीला वेगळे वळण येते की काय अशी चर्ची सुरु आहे. (विधान परिषद निवडणूक 2022)
शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी
काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
राष्ट्रवादी : रामराजे नाईक-निंबाळकर,
एकनाथ खडसे
भाजप : प्रा. राम शिंदे, प्रवीण दरेकर, उमा
खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय.
हेही वाचलेत का?