विधान परिषद निवडणूक : लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक मतदानासाठी विधानभवनात दाखल!  | पुढारी

विधान परिषद निवडणूक : लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक मतदानासाठी विधानभवनात दाखल! 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा;  विधानपरिषद निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असतानाही पुन्हा एकदा मतदान करण्यासाठी पुण्याहून मुंबईला आले आहेत. ते सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ते विधान भवनात दाखल झाले. (विधान परिषद निवडणूक 2022)

राज्यसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आजारातही हिंमत दाखवत पक्ष आदेश पाळला होता. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय सुकर झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचे श्रेय जगताप आणि मुक्ता टिळक यांना दिले होते. यावेळीही भाजपने हे दोन्ही आमदार मतदान करतील असे स्पष्ट केले होते.

पक्ष आदेश पाळणे आपले कर्तव्य – मुक्ता टिळक

भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक या थोड्याच वेळात विधानभवनात दाखल झाल्या आहेत. त्या सकाळीच पुण्याहून निघाल्या आहेत. आजारी असतानाही पक्ष आदेश पाळणे आपले कर्तव्य असल्याचे टिळक यांनी स्पष्ट केले होते.

विधान परिषद निवडणूक उमेदवार

शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी
काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
राष्ट्रवादी : रामराजे नाईक-निंबाळकर,
एकनाथ खडसे
भाजप : प्रा. राम शिंदे, प्रवीण दरेकर, उमा
खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय.

हेही वाचलतं का?

 

Back to top button