विधान परिषद निवडणूक : क्षितिज ठाकूर अमेरिकेतून मुंबईत दाखल, ‘बविआ’ची तीन मते ठरणार निर्णायक | पुढारी

विधान परिषद निवडणूक : क्षितिज ठाकूर अमेरिकेतून मुंबईत दाखल, 'बविआ'ची तीन मते ठरणार निर्णायक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची मते निर्णायक ठरू शकतात. या मतदानासाठी अमेरिकेत गेलेले आमदार क्षितीज ठाकूर हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते दुपारी मतदानाला विधान भवनात पोहोचणार आहेत.

राज्यसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला साथ दिल्याने शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला. विधान परिषद निवडणुकीत भाजपला अतिरीक्त १७ मतांची गरज आहे. त्यामुळे यावेळीही भाजपने ठाकूर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या उमेदवारांनीही ठाकूर यांची भेट घेतली; पण ठाकूर यांनी यावेळीही भूमिका स्पष्ट केली नाही.

आमदार क्षितीज ठाकूर हे अमेरिकेत असल्याने ते मतदानाला येणार नाहीत अशी चर्चा होती. त्यामुळे यावेळी बहुजन विकास आघाडीचे दोन मते मतपेटीत जाणार अशी चर्चा होती. मात्र आता क्षितीज  ठाकूर हे मुंबईत दाखल झाले आहेत. आणि ते आपला मतदानाचा हक्‍क बजावतील.

हेही वाचा  

Back to top button