राज्यसभा निवडणुकीवेळी मुंबईतून ‘ताे’ फोन काेणी केला, हे आम्हाला माहित आहे : खा. संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभा निवडणुकीत सुहास कांदे यांचे मत बाद केले गेले. त्यांचे मत बाद करा, असा अआदेशच दिल्लीतून आला. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्लीतून कोणी फोन केले, हे आम्हाला माहित आहे. राज्यसभा निवडणुकीत वाईट राजकारण झाले, असा आराेप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.
केंद्र सरकारवर टीका करणार्या लोकांना केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देत आहे. देशातील कोणती यंत्रणा स्वतंत्र आहे? याचा शोध घेतला पाहिजे. हे सर्व राजकीय द्वेषापोटी घडत आहे. विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजप करत असून हिटलरनेही असे काम केले नव्हते, अशी बाेचरी टीकाही त्यांनी केली.
मु्ंबईत अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. दिल्लीतही मागील तीन दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीदेखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. ही हुकूमशाही आहे. हिंदूस्थान सारख्या लोकशाहीचा डंका जगभर वाजवला जातो याच देशात लोकशाहीचा गळा गोठण्यात येतोय. हा देशाच्या स्वातंत्र्याचा पराभव आहे. पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल, अशी स्थिती झाली आहे. वैचारिक मतभेद असू शकतात; पण व्यक्तीला विरोध नाही, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रपती हवा की रबर स्टॅम्प ?
आधीच कार्यक्रम ठरल्यामूळे ममता बॅनर्जींच्या बैठकीला जाणे अशक्य आहे. त्यांनी आयाेजित बैठकीला शिवसेना आपला प्रतिनिधी पाठवेल. मुंबईत बैठक झाली असती तर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहीले असते. राष्ट्रपती हवा असेल तर शरद पवारांसारख्या नेत्यांचा विचार केला जावा. आणि रबर स्टॅम्प हवा असेल तर अनेक नेत्यांची रांग आहेच, असा टाेलाही त्यांनी लगावला,
हेही वाचलंत का?
- COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरु; २४ तासांत ८,८२२ नवे रुग्ण, १५ मृत्यू
- सांगली : एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकरानं प्रेयसीचा गळा आवळला
- कोल्हापूर : रंकाळा तलाव कोनशिलेवर पिचकारी; इतिहासप्रेमींकडून तीव्र शब्दांत निषेध
- खुनाच्या प्रयत्नातील आरोपीचा विवाहाचा डाव फिस्कटला, मंदीरात लग्न करण्यापूर्वीच ठोकल्या पोलिसांनी बेड्या

