खुनाच्या प्रयत्नातील आरोपीचा विवाहाचा डाव फिस्कटला, मंदीरात लग्न करण्यापूर्वीच ठोकल्या पोलिसांनी बेड्या | पुढारी

खुनाच्या प्रयत्नातील आरोपीचा विवाहाचा डाव फिस्कटला, मंदीरात लग्न करण्यापूर्वीच ठोकल्या पोलिसांनी बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पाच महिन्यांपासून फरार असलेल्या तरूणाला त्याच्या लग्नाच्या दिवशीच मंदीरात प्रेमविवाह करण्यापूर्वीच पोलिसांनी लग्नाच्या कपड्यांनीशी अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या अटकेमुळे त्याचे प्रेमविवाह करण्यापूर्वीच त्याचे स्वप्नही भंग झाले. हा फिल्मी थरार लोणी काळभोर पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर घडला.

अमित बालाजी सोनवणे (26) आणि अभिषेक संजय पवार (22, दोघेही रा.रा. पाण्याच्या टाकीजवळ, माळी मळा, लोणी काळभोर) या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली. 21 जानेवारी 2022 रोजी अमित सोनवणे, अभिषेक पवार यांच्यासह दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून येऊन हातामध्ये लोखंडी कोयते फिरवुन दहशत निर्माण करून फिर्यादी यांना जीवे मारण्याचे उद्देशाने खुनाचा प्रयत्न केला होता.

Vladimir Putin : पुतीन यांची लघवीदेखील गोळा करतात त्यांचे बॉडीगार्ड!

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबींग ऑपरेशन राबवले जात असताना सहायक पोलिस निरीक्षक राजु महानोर हे कारवाई करत होते. त्यावेळी फरार आरोपीचा शोध घेत असताना अमंलदार राजेश दराडे व बाजीराव वीर यांना खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयीत आरोपी थेऊर येथील म्हतारआई मंदिरात प्रेमविवाह करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

पाच महिन्यांपासून फरार असलेला अमित सोनवणे विवाहासाठी त्याच्या साथीदारांमार्फत येणार असल्याचे समजले. याबात महानोर यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांन वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर अमंलदार नितीन गायकवाड, संतोष होणे, दराडे, वीर यांच्या पथकाने मंदीराच्या बाहेर सापळा रचला. पोलिसांना मिळालेली माहिती खरी ठरली.

मुंबई : विवाहितेवर सामूहिक बलात्कार; चौघांना अटक

एका कारमधून लग्नाच्या वेशात असलेल्या नवरदेवाबरोबर चार जण उतरले. त्यानंतर ते म्हतारआई मंदीराच्या आवारात आले असता व मंदीरातील पुजार्‍याकडे जात असताना त्यांना पोलिस पकडणार याची चाहूल लागली. तेथून लागलीच धूम ठोकण्याच्या तयारीत असताना लग्नाच्या पोषाखात असलेल्या अमितसह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक मोरे करत आहे.

सोलापुरात अन्न प्रशासनाने दीड कोटीचा गुटखा जाळला

Back to top button