Nupur Sharma : वादग्रस्त वक्तव्य भोवणार?; नुपूर शर्मा यांना मुंब्रा पोलिसांचे समन्स | पुढारी

Nupur Sharma : वादग्रस्त वक्तव्य भोवणार?; नुपूर शर्मा यांना मुंब्रा पोलिसांचे समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने निलंबित केलेल्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंब्रा पोलिसांनी नुपूर शर्मा  (Nupur Sharma) यांना वादग्रस्त धार्मिक वक्तव्याबाबत जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे.

तर दुसरीकडे भाजपच्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा दिली आहे. पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. शर्मा यांनी याबाबतची दिल्ली पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता शर्मा यांना सुरक्षा देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एफआयआरच्या आधारे या धमक्‍याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत कथित वादग्रस्त विधान केल्‍याने भाजपने रविवारी नुपूर शर्मा  यांना पक्षातून निलंबित केले आहे. मात्र, नूपुरने आपल्या वक्तव्यावर माफीही मागितली आहे.

दरम्‍यान, नुपूर शर्माने तक्रारीमध्ये म्‍हटले की, मला आणि माझ्या कुटुंबाला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तसेच काही छायाचित्रे मी जोडत आहे. कृपया याची दखल घेण्यात यावी. एवढेच नाही तर पुन्हा ट्विट करून त्याने आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण केला आहे. असे त्‍यांनी म्हटले होते. आता शर्मा यांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button