Imtiyaz Jaleel : भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने एमआयएमकडे पाठिंबा मागावा | पुढारी

Imtiyaz Jaleel : भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने एमआयएमकडे पाठिंबा मागावा

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाला खरंच पराभूत करायचे असेल, तर राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेनेने एमआयएमकडे जाहीर पाठिंबा मागावा, अशी भूमिका खुद्द एमआयएमचे अध्यक्ष खासदार बॅ. असुदुद्दीन ओवैसी यांनी मांडली असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी सांगितले.

राज्यसभेत आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी भाजप आणि शिवसेना जोरदार प्रयत्न करीत आहे. विविध राजकीय पक्षांशी बोलणी करून त्यांच्या आमदाराच्या मतांची जुळवाजुळव केली जात आहे. छोट्या पक्षातील आमदारांना वळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. यात शिवसेनेने एमआयएमच्या आमदाराशी देखील संपर्क साधल्याची चर्चा सुरू आहे. परंतु आता खुद्द एमआयएमचे अध्यक्ष खा. ओवैसी यांनीच ट्विट करून जर भाजपला राज्यसभा निवडणुकीत पराभूत करायचे असेल, तर महाविकास आघाडीने आमच्याकडे जाहीर पाठिंबा मागावा, तसे झाल्यास एमआयएम त्यांना पाठिंबा देईल, असे त्यांनी (Imtiyaz Jaleel) म्हटले आहे.

दरम्यान, या ट्विटबाबत प्रदेशाध्यक्ष खा. जलील यांनी सोशल मीडियावर मेसेज करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता ओवैसी यांच्या या ट्विट्वर महाविकास आघाडी प्रामुख्याने शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण काही दिवसांपूर्वीच एमआयएम नेते आ. अकबरोद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिली होती. या प्रकरणानंतर सेनेकडून जोरदार टीका देखील करण्यात आली होती.

हेही वाचलंत का ?

Back to top button