शिवसेनेचा पुन्हा एक जिल्हाप्रमुख मैदानात, विधानरिषदेसाठी आमशा पाडवी, सचिन अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब | पुढारी

शिवसेनेचा पुन्हा एक जिल्हाप्रमुख मैदानात, विधानरिषदेसाठी आमशा पाडवी, सचिन अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे राज्यात राज्यसभा निवडणुकीचे वातावरण वातावरण तापले असताना २० जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेने माजी मंत्री सचिन अहिर आणि शिवसेनेचे नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेने संजय पवार यांच्या रूपाने एका जिल्हाप्रमुखाला राज्यसभेचा उमेदवारी दिली आहे तर आमच्या पाडवी यांच्या रूपाने दुसरा जिल्हाप्रमुख विधानपरिषदेत रिंगणात उतरविले आहे.

राज्यसभेसाठी धनंजय महाडिक यांची उमेदवारी मागे घेण्याच्या बदल्यात महाविकास आघाडीने भाजपला विधान परिषदेची एक जागा जागा सोडण्याची हमी दिली होती. मात्र भाजपने हा प्रस्ताव फेटाळल्याने विधान परिषदेसाठी ही निवडणूक अटळ आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने सचिन अहिर आणि पाडवी यांची उमेदवारी निश्चित केली आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आणि आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदारसंघ सोडणाऱ्या सचिन अहिर यांचेही आता राजकीय पुनर्वसन होणार आहे.

२०१९ मध्ये आमशा पाडवी यांनी अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेस नेते आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. त्यांचा अवघ्या २ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन शिवसेनेने ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे.

 हे ही वाचा :

Back to top button