डेल्टा प्लस : राज्यात आढळले डेल्टा प्लस व्हेरियंटचे २० रुग्ण | पुढारी

डेल्टा प्लस : राज्यात आढळले डेल्टा प्लस व्हेरियंटचे २० रुग्ण

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात 80 टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट आढळत आहेत. राज्यात आतापर्यंत 65 डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या 65 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष, तर 33 स्त्रिया आहेत. 65 रुग्णांपैकी एका वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू वगळता डेल्टा प्लस रुग्णांमधील आजाराचे स्वरुप सौम्य ते मध्यम स्वरुपाचे आहे.

डेल्टा प्लस

कोरोना विषाणूचे जिनोमिक सिक्वेन्सिंग

कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे. राज्यात दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून 100 प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येते. त्यात आणखी 20 रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या 65 झाली आहे.

नव्याने आढळलेले व्हेरियंटचे 20 रुग्ण

नव्याने आढळलेले व्हेरियंटचे 20 रुग्ण हे मुंबई 7, पुणे 3, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी 2, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक 33 रुग्ण 19 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील आहेत तर त्या खालोखाल 46 ते 60 वर्षे वयोगटातील 17 रुग्ण आहेत. यामध्ये 18 वर्षांखालील 7 रुग्ण असून 60 वर्षांवरील 8 रुग्ण आहेत.

विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग असून या संदर्भात जनतेने कोणतीही भीती न बाळगता कोविड अनुरुप वर्तनाचा अंगीकार करणे गरजेचे आहे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनात आई वडील गमावलेल्याना नोकरी

अनाथ मुलांना नोकरी, शिक्षणामध्ये १ टक्के आरक्षण देण्याचा तसेच अनुसूचित जातींप्रमाणे वय, परीक्षा शुल्क, शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीमध्ये सवलत आज (दि.११) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय अनाथांच्या जीवनात नवीन प्रकाश आणणारा ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या.

मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या कि, राज्यातील अनाथांना १ टक्के समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय यापूर्वी एप्रिल २०१८ मधील शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे.

Back to top button