पुणे, पुढारी वृत्तसेवा: भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील (बीएचआर प्रकरण) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील देवकीनंदन झंवर यांना न्यायालयाने २० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. विशेष सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा आदेश दिला. झंवरचे फरार कालावधीत केले दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये वास्तव्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. १०) दुपारी साडे बारा वाजता नाशिकमधील पंचवटी परिसरातून त्याला अटक केली.
बीएचआर प्रकरण मध्ये १९ जणांना अटक झालेली आहे. या गुन्ह्यात ७२ कोटी ५६ लाख २१ हजार १५६ रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दागिने व रोख रक्कम मिळून ३० लाख ५ हजार ४३६ रुपयांचा ऐवज आतापर्यंत घरझडतीत मिळून आलेली आहे.
पतसंस्थेने पुण्यात २१ कोटी ३० लाखांत तीन मालमत्ता सुनील झंवर याने खरेदी केल्या हाोत्या.
त्याच्या भागीदार योगेश लढ्ढा याच्या नावाने अवघ्या ५ कोटी ७२ लाख ४४ हजार २२१ रुपयांत खरेदी केल्याचेही उघड झाले आहे.
चार कोटी दोन लाख ३८ हजार ९१ रुपयांच्या ठेव पावत्या बेकायदेशीरपणे वर्ग केल्याचा विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयास सांगितले.
फरार कालावधीत सुनील झंवर हा दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश राज्यात वास्तव्यास होता.
फरार कालावधीत त्याने पुरावे नष्ट केले असण्याची शक्यता आहे. त्याचे वास्तव्याचे ठिकाण नेमके कोठे होते,
त्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी नेऊन तपास करायचा आहे.
त्याने योजनाबद्ध पद्धतीने कट रचून मालमत्तांची लिलाव प्रक्रीयेबाबत विक्री केली असल्याने पोलिस कोठडी सुनाविन्यात आली.
बीएचआर प्रकरण मध्ये झंवर पिता-पुत्राच्या नावाने असलेल्या फर्मच्या नावे मालमत्ता विकत घेतल्या असून त्यासाठी सुनील झंवरनेच पैसा पुरविला आहे.
कोणाच्या सांगण्यावरून व कोणासाठी या मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत यासह कर्ज निरंक दाखले देखील या हार्डडिस्कमध्ये आहेत.
यासाठी त्याला पोलिस कोठडीची मागणी अॅड. चव्हाण यांनी केली.