Sarthi : सारथी संस्थेस खारघरमध्ये भूखंड : ठाकरे सरकारचा निर्णय | पुढारी

Sarthi : सारथी संस्थेस खारघरमध्ये भूखंड : ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) (Sarthi) पुणे, या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर ३७, मधील ३ हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे. सारथी (Sarthi) संस्थेमार्फत राज्यातील पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व मुंबई येथे विभागीय कार्यालय, वसतिगृहे, अभ्यासिका व ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नागरिक समुपदेशन कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी ५०० मुलांचे व ५०० मुलींचे स्वतंत्र निवासी वसतीगृहदेखील उभारले जाणार आहे. नवी मुंबई येथील केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर ३७, मधील ३५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भूखंड विशेष बाब म्हणून नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन विभागास देण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button