पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना १९८८मधील रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आता त्यांची रवानगी पटियाला कारागृहात झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवज्योत सिंग सिद्धू कैदी नंबर २४१३८३ असतील त्यांना बॅरक नंबर सातमध्ये ठेवण्यात आले आहे. कारागृहातील कैद्यांना दिवसभरात आठ तास काम करावे लागते. कारागृहात सिद्धू यांना क्लार्कचे काम देण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना बॅरकमध्येच काम करावे लागेल. त्यांना प्रतिदिन ३० ते ९० रुपये वेतन मिळेल. हे पैस थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील,अशी माहिती पटियाला कारागृहातील अधिकार्यांनी दिली.
२७ डिसेंबर १९८८ च्या संध्याकाळी सिद्धू हे मित्र रुपिंदर सिंह संधू यांच्यासाेबत पटियालाच्या शेरवाले गेट मार्केटमध्ये गेले हाेते. येथे त्यांचा पार्किंगवरून ६५ वर्षीय गुरनाम सिंग यांच्यासोबत वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.सिद्धू यांनी गुरनाम सिंग यांना धक्काबुक्की केली. पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर यावर फिर्यादी पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने १५ मे २०१८ रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेश रदद केला होता.
सध्या सिद्धू पटियाला कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्य वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकृती कारणास्तव ते गहू, साखर, मैदा आणि अन्य पदार्थांचे सेवन करु शकत नाहीत. त्यामुळे ते कारागृहात देण्यात येणारे जेवण घेवू शकणार नाहीत. न्यायालयाने त्यांना डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार देण्यात यावा, असाही आदेश दिला आहे.
हेही वाचा :