#Neeraj chopra : नीरज चोप्रा आणि कुटुबीयांचा विधानसभेत होणार सत्कार | पुढारी

#Neeraj chopra : नीरज चोप्रा आणि कुटुबीयांचा विधानसभेत होणार सत्कार

मुंबई, पुढारी ऑनलाईन , टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा (#Neeraj chopra) आणि त्याच्या कुटुंबीयांचा महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्कार करण्यात येणार आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्राला(#Neeraj chopra) सुवर्णपदक मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून त्याचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली.

नीरजच्या कुटुंबीयांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. मुंबईत त्याचे भव्य स्वागत करणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी ठाकरे यांनी बोलताना, ‘मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो’ असे गौरवोद्गार काढले. हरियाणातील खांदरा हे नीरज चोप्राचे मूळ गाव आहे.

नीरज (#Neerj chopra)हा रोड मराठा समाजाचा असून त्याचे महाराष्ट्राशी नाते आहे. याचा संदर्भ देत ठाकरे यांनी नीरजच्या कामाचा गौरव केला.
पानिपतजवळच्या खंदरा गावचा रहिवासी असलेल्या नीरजचे मूळ महाराष्ट्रात आहे.

तब्बल शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेली भारताच्या अ‍ॅथलेटिक्समधील सुवर्ण पदकाची प्रतीक्षा अखेर शनिवारी संपली.

नीरज चोप्रा (#Neerj chopra) याने भालाफेकीत सुवर्ण फेक करत भारताला अ‍ॅथलेटिक्स फील्ड अ‍ॅण्ड ट्रॅक प्रकारात पहिलेच सुवर्ण पदक मिळवून दिले.

नीरजच्या या सुवर्णपदकाने टोकिओ ऑलिंम्पिची सांगता गोड झाली. नीरजच्या या यशाने संपूर्ण भारतात आनंदाची लहर आहे.

त्याला विविध राज्यांनी रोख बक्षिसे जाहीर केली आहेत.

Back to top button