‘चुरा के दिल मेरा’ या गाण्यावर राखी सावंतचा जिममध्ये डान्स; व्हिडिओ व्हायरल | पुढारी

'चुरा के दिल मेरा' या गाण्यावर राखी सावंतचा जिममध्ये डान्स; व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुड अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. राखी सावंत तिच्या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. लोकांना तिचे व्हिडिओ खूप आवडतात. राखी सावंत ने आता पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावर जिममध्ये नाचताना दिसत आहे. राखी सावंत च्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राखी सावंत व्हिडिओमध्ये जिममधील पार्टनर सोबत ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्यावर डान्स करत असल्याच दिसत आहे. राखीच्या या व्हिडिओला काही तासातच हजारो व्हुज मिळाले आहेत. राखी सावंत ने या अगोदर फनी व्हिडिओ शेअर केले आहेत.

तिचे अनेक नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. तिच नूकतच ‘ड्रीम में एंट्री’ हे गान रिलीज झाल होत. यानंतर आता ‘लॉकडाऊन’ हे नवं गान रिलीज झालं आहे. तिने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे, ज्यात मैं हूं ना आणि दिल बोले हडिप्पा, जोरू का गुलाम, या चित्रपटांचा समावेश आहे.

हे ही वाचलत का :

Back to top button