टीम इंडियाचा विजय पावसाने हिरावला, इंग्लंडविरुद्धची कसोटी अनिर्णित | पुढारी

टीम इंडियाचा विजय पावसाने हिरावला, इंग्लंडविरुद्धची कसोटी अनिर्णित

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsENG TEST भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पाचव्या दिवशी व्यत्यय आणाला. पावसामुळे खेळ वाया गेला. परिणामी ही कसोटी अनिर्णीत सुटली.

शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. पण पंचांनी चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. चहापानानंतर पावसाने अधिक जोर धरल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या डावात अर्धशतकी आणि दुसऱ्या डावात शतकी खेळी करणाऱ्या जो रूटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. चौथ्या दिवसअखेर भारताने १ बाद ५२ धावा केल्या होत्या.

पहिल्या डावात दमदार खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब्रॉडने तंबूचा मार्ग दाखवत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी १२ धावांवर नाबाद होते.

तत्पूर्वी, इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात ३०३ धावांवर सर्वबाद झाला. भारताला सामना जिंकण्यासाठी २०९ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताच्या दुसऱ्या डावात लोकेश राहुल २६ धावांवर बाद झाला. त्याला यष्टिरक्षक जोस बटलरच्या हाती स्टुअर्ट ब्रॉडने झेलबाद केले.

दुसरीकडे, कर्णधार जो रूटने इंग्लंडसाठी सर्वाधिक १०९ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने ६४ धावा देऊन ५ बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने २-२ आणि मोहम्मद शमीने १ विकेट घेतली.

२ दिवस पावसाने व्यत्यय आणला…

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे व्यत्यय आला. दुसऱ्या दिवसाचा अर्धा खेळ पावसामुळे वाहून गेला. तिसऱ्या दिवशीही अधूनमधून पाऊस पडला. यामुळे तिसऱ्या दिवशीही सामना लवकर थांबवण्यात आला. आता निर्णायक पाचव्या दिसशी पावसाने व्यत्यय आणाला आहे. भारताला विजयासाठी अवघ्या १५७ धावांची गरज आहे.

Back to top button