''उद्धव ठाकरे हे असंस्कृत सीएम...'' नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल | पुढारी

''उद्धव ठाकरे हे असंस्कृत सीएम...'' नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : ”उद्धव ठाकरे हे असंस्कृत सीएम आहेत. ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते. मुख्यमंत्र्यांनी जाहीरात बाजी करून सभा घेतली. या सभेत फक्त 30 ते 35 हजार लोक होते. तीनशे रूपये देऊन वांद्र्यातील सभेला लोक जमा केले. घड्याळ लावून मी ठाकरेंची सभा पाहिली, फक्त 50 मिनिटे ही सभा चालली. उद्धव ठाकरेंच भाषण बोगस होते.” अशा खोचक शब्दांमध्ये भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. मुंबई येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधत अनेक आरोप केले.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी देणार? केंद्र सरकारने केलेल्या रोजगार निर्मितींशी तुलना करता राज्य सरकारने किती रोजगार निर्माण केले ? अडीच वर्षात ठाकरे सरकारने किती जणांच्या चुली पेटवल्या ? असे सवाल करत ठाकरे सरकारला राणेंनी धारेवर धरले. मराठी तरूणाच्या हातात तुम्ही दगड दिले आहेत, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

बाबरी मशिद वेळी उद्धव ठाकरे कुठे होते? एवढच नाही तर शिवसेनेच्या वाटचालीत उद्धव ठाकरे कुठे होते? महाराजांच्या नावाने सत्ता मिळवून कोण मुख्यमंत्री झाले? शिवसैनिकांना अडीच वर्षात ठाकरे सरकारने काय दिले ? असे अनेक प्रश्न  यावेळी राणे यांनी उपस्थित केले.

भाजपमुळेच सेनेचे नेते, आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपमुळेच शिवसेना टिकून आहे. शिवसेनेच्या वाटचालीत आमचं कर्तुत्व आहे ,असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं.

रमेश मोरे, जया जाधव यांची हत्या का झाली याचे गुढ शोधून काढा. त्याचबरोबर दिशा सालीयनवर अत्याचार करून ठार मारण्यात आलेलं आहे. असे आरोप देखील यावेळी केले.

हेही वाचा

Back to top button