Ira Khan : आमिरच्या लेकीने ट्रोलर्सची बोलती केली बंद, धडाधड टाकले फोटो | पुढारी

Ira Khan : आमिरच्या लेकीने ट्रोलर्सची बोलती केली बंद, धडाधड टाकले फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड स्टार आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. अलीकडेच इराने तिचा वाढदिवस तिचे पालक, बॉयफ्रेंड आणि मित्रांसोबत साजरा केला. यावेळी संपूर्ण कुटुंबाने पूल पार्टी केली. विशेष म्हणजे इराने बिकिनी घालून आपल्या कुटुंबासोबत केक कापला. इराला बिकिनीमध्ये पाहून काही लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. यानंतर तिने तिच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत तिचे आणखी काही बोल्ड फोटो धडाधड सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Ira Khan)

८ मे रोजी तिने तिच्या वाढदिवसाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यावेळी बिकिनी घालून वाढदिवस साजरा केल्याबद्दल लोक तिच्यावर जोरदार टीका करत होते. या फोटोंमध्ये आमिरखान , रीना, सावत्र भाऊ आझाद, बॉयफ्रेंड नुपूर शिखर, किरण राव आणि तिच्यासोबत काही मित्रही होते. आता तिने या पूल पार्टीचे आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय-If everyone is done hating and trolling my last birthday photo dump… here are some more! 😄👍✌

फातिमा सना शेखही दिसली

तिच्या या फोटोंमध्ये ती बॉयफ्रेंड नुपूर शिखर, तिच्या जवळच्या मैत्रिणी आणि अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रंगीबेरंगी स्ट्रीप बिकिनीमध्ये दिसत आहे. आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. इरा खान अद्याप कोणत्याही बॉलीवूड प्रोजेक्टशी संबंधित नाही; पण तिची आवड थिएटर आणि दिग्दर्शनात आहे. २०१९ मध्ये तिच्या दिग्दर्शनाखाली आलेले एक नाटकही प्रदर्शित झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

Back to top button