नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्यास केव्हा परवानगी मिळणार, यांची प्रतीक्षा मुंबईकरांना लागून राहिली आहे. यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी केव्हापासून सुरु होईल, याबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्य सरकारने कोरोना रुग्णवाढ होणार्या जिल्ह्यांमधील निर्बंध कायम ठेवले आहेत. तसेच मुंबईतील लोकस सेवा केवळ
अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणार्यांसाठी सूरु ठेवली आहे.
ज्या जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाचा दर कमी आहे. तेथील निर्बंध शिथील केले आहेत. मात्र अद्याप सर्वसामन्यांना लोकल सेवा सुरु करण्याबाबतचा निर्णय झालेला नाही.
राज्य सरकारने लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विरोधी पक्ष नेत्यांनीही राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.
मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याबाबत दानवे म्हणाले की, राज्य सरकारने नागरिकांच्या मागणीचा विचार करणे आवश्यक आहे.
राज्य सरकारने लोकल सुरु करण्याची तयारी दाखविल्यानंतर तात्काळ केंद्र सरकारही लोकल सुरु करण्यास परवानगी देईल.
लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी. यानंतर आम्ही तात्काळ सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करु राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात केंद्र सरकार आडकाठी आणणार नाही. कोरोना संसर्गाची परिस्थितीवर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे राज्यांनी निर्णय घेतल्यानंतरच आम्ही लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करु, असेही दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचलं का?