नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कोरोनाची दुसरी लाट कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मागील २४ तासांमध्ये ४२ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. ५३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याच्या संख्येपेक्षा संसर्ग झालेल्यांची संख्या अधिक राहिल्याने चिंता कायम आहे.
आतापर्यंत देशात ३ कोटी १८ लाख १२ हजार ११४ जणांना कोरोनाची बाधा झाली. तर ३ कोटी ९ लाख ७४ हजार ७४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या ४ लाख ११ हजार ०७६ सक्रीय रुग्ण आहेत. ४ लाख २६ हजार २९० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
बिहारमधील संसर्ग दर कमी झाला आहे. यामुळे राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात नववी आणि दहावीचे वर्ग ७ ऑगस्टपासून सूरु होतील. आठवीचे वर्ग हे १६ ऑगस्टपासून सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचलं का?