या बेटावर वेगवेगळ्या प्रजातींचे चार हजारांपेक्षाही अधिक सर्प | पुढारी

या बेटावर वेगवेगळ्या प्रजातींचे चार हजारांपेक्षाही अधिक सर्प

रिओ डी जनैरो : काही काही बेटं वेगळ्या वैशिष्ट्यांसाठीच प्रसिद्ध आहेत. बाहुल्यांसाठी, सशांसाठी प्रसिद्ध असलेली बेटंही आहेत. असेच एक बेट आहे जे सापांसाठी प्रसिद्ध आहे. या बेटाला ‘स्नेक आयलंड’ असेच म्हटले जाते. या अवघ्या 43 हेक्टर जागेच्या बेटावर वेगवेगळ्या प्रजातींचे चार हजारांपेक्षाही अधिक साप आहेत.

ब्राझीलच्या या बेटाचे खरे नाव ‘इल्हा दा क्युइमादा ग्रँडी ’ असे आहे. दूरून पाहिल्यावर हे बेट अतिशय निसर्गरम्य वाटते; पण ते जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक आहे.

स्नेक आयलंड

जगातील सर्वात खतरनाक साप या बेटावर मोठ्या संख्येने आढळतात. याठिकाणी वायपर प्रजातीचेही अनेक सर्प असून ते हवेतही उसळी घेऊ शकतात. या सापांचे विष इतके भयानक असते की ते मांसही विरघळून टाकते असे म्हटले जाते.

ब्राझीलियन नौदलाने सर्वसामान्य लोकांना या बेटावर जाण्यास बंदी घातलेली आहे. केवळ काही सर्पतज्ज्ञ किंवा संशोधक पूर्वपरवानगी घेऊन या बेटावर जाऊ शकतात.

मात्र, तेही किनारपट्टीवरील भागातच फिरून परत येतात. त्यांचीही अधिक आत जाण्याची हिंमत होत नाही. काही तस्कर या बेटावर चोरीछुपे जाऊन सापांना अवैधरीत्या पकडून त्यांना विकतात.

येथील गोल्डन लान्सहेड वायपरची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 18 लाख रुपये आहे. सापाची ही प्रजाती अतिशय धोक्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या बेटावरील नैसर्गिक अधिवासात असलेल्या अशा सापांच्या संरक्षणाचे प्रयत्न होत आहेत.

 

Back to top button