पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय हॉकी संघाने जर्मनीवर 5-4 ने मात करत 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. यामुळे संपूर्ण देशभरातून संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून, त्यात म्हणावी तितकी झेप आपल्याला घेता आली नव्हती. तब्ब्ल ४१ वर्षांनंतर भारताने कांस्यपदक मिळवले. यामुळे सारा देश आनंदात आहे. खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही हॉकी टीमचे अभिनंदन ट्विटरवरून केले आहे.
जयंत पाटील यांचा "करेक्ट कार्यक्रम" हा डायलॉग गेली दहा वर्षे पश्चिम महाराष्ट्रात ऐकायला मिळतो. २०१९ मध्ये मुलाखतकार सुधीर गाडगीळांनी घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या विजयामागे काय आहे? याचे उत्तर दिले होते.
आम्ही उगाच धावून पळून जाऊन लढाया करत नाही तर आमच्या टप्प्यात आलं कि आम्ही कार्यक्रम करतोच! असं उत्तर जयंत पाटील यांनी दिल होतं. आज त्याच डायलॉगचा आधार घेत जयंत पाटलांनी भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन केलंय.
जयंत पाटील ट्विटमध्ये म्हणतात कि, #TeamIndia द्वारे अभूतपूर्व पुनरागमन! ३-१ ने पिछाडीवर असूनही त्यांनी आपली शांतता राखली आणि योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला. या जोरदार विजयाबद्दल अभिनंदन. तुम्ही 41 वर्षानंतर #ऑलम्पिकमध्ये भारताला गौरव मिळवून दिले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. हॉकी संघाने जर्मनीचा ५-४ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. १९८० नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदकावर नाव कोरले.
भारताला कांस्य पदकाच्या लढतीत रिओ ऑलिम्पिक-२०१६ च्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीशी सामना करावा लागला. मात्र, भारताने चांगला खेळ करत जर्मनीला मात दिली. या विजयाने भारतीय हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.
हे ही वाचा :