पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टोमॅटो सॉस लावून जखमी झाल्याचा दावा केला, आराेप करत केंद्रीय यंत्रणेचा भाजपचे नेते गैरवापर करत आहेत. केंद्र सरकारने भोंग्यासंदर्भात नवीन धोरण जाहीर करावे, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाहनावर हल्ला करत मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप साेमय्यांनी केला हाेता. यावर राऊत म्हणाले, भाजप केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत आहे. हल्ल्यात जखमी झाल्याचा दावा साेमय्या करत आहेत. मात्र सोमय्यांनी टोमॅटो सॉस लावून आपण जखमी झाल्याचे सांगितले. महाराष्ट्र भाजपचे नेते लोकशाहीचे प्रवचन झाडत आहेत. सत्तेत न आल्य़ाने विरोधकांच्या स्पीकरमधून अशी वक्तव्य येत आहेत, अशी टीकाही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.
राज्य सरकारने संवादाला जागाच ठेवली नसून राज्यात हिटलरशाही सुरु आहे, 'मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सर्व काही सुरू अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्र भाजपचे नेते लोकशाहीचे प्रवचन झाडत आहेत. सत्तेत न आल्य़ाने विरोधकांच्या स्पीकरमधून अशी वक्तव्य येत आहेत. भाजप नेत्यांचे नेतृत्व मोदी करत आहेत. देवेंद्र फडणवीसांची भावना आम्ही समजू शकतो. हिटलरशाही, हुकुमशाही काय आहे हे त्यांनी ओळखावे. या अस्वस्थ नेत्यांनी घरात बसुन हनुमान चालिसा वाचून आपले मन शांत करावे, असा टाेलाही त्यांनी लगावला.
हेही वाचलंत का?