Elon Musk : अखेर एलाॅन मस्क झालेच ‘ट्विटर’चे मालक; ४४ अब्ज डाॅलर्सला झाला व्यवहार | पुढारी

Elon Musk : अखेर एलाॅन मस्क झालेच 'ट्विटर'चे मालक; ४४ अब्ज डाॅलर्सला झाला व्यवहार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मायक्रोब्लॉगिंग साइट असणारे ट्विटर अखेर जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असणारे एलाॅन मस्कचे यांच्या मालकीचे झाले. टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क आणि ट्विटर इंक यांच्यामध्ये ४४ अब्ज अमेरिकन डाॅलर्सला व्यवहार झाला. एलाॅन मस्क यांनी ट्विटर इंकमध्ये ५४.२० डाॅलर रोखीमध्ये प्रति शेअर विकत घेतला आहे. ट्विटर इंकनेही मस्क यांची ही ऑफर स्वीकारली आहे आणि अधिकृत घोषणादेखील केली आहे. (Elon Musk)

या व्यवहारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सोमवारी वाॅलस्ट्रीटवर ट्रेडिंगमध्ये ट्विटर इंकचे शेअर्स हे ५ टक्क्यांनी अधिक वाढले. इंट्रा-डे-ट्रेडिंग दरम्यान शेअरची किंमत ५२.२९ डाॅलर इतक्या किमतीवर गेली. एलाॅन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सांगितले की, “मला आशा आहे की, माझे सर्वांत कट्टर विरोधकदेखील ट्विटरवर राहतील. कारण, मुक्त संवादाचा अर्थच तो आहे.” एलाॅन मस्क यांचे ट्विट व्हायरल होत आहे. (Elon Musk)

मागील आठवड्यात मस्क यांनी सांगितले होते की, त्यांनी ४४ अब्ज अमेरिकन डाॅलर्समध्ये ट्विटर विकत घेण्याचा ऑफर दिली होती. याच किमतीवर त्यांनी व्यवहाराचा अंतिम प्रस्ताव दिला आहे. एलाॅन मस्क हे मागील काही दिवसांपासून ट्विटर भागधारकांसोबत बैठक घेऊन त्यांच्याकडून समर्थन मागत होते. ट्विटरला आणखी विकसीत करण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्यासाठी एक सक्षम व्यासपीठ होण्यासाठी वैयक्तिक पातळीवर घेण्याची गरज होती.

पहा व्हिडिओ : रात्रीच्या अंधारात जंगल काय सांगतं?

हे वाचलंत का? 

Back to top button